शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील नव्याने स्थापण झालेल्या माळवाडी गावातील सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष यांना राजकीय वैमन्यशातून सुपारी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे . मी सुपारी कोणाला दिली याची चौकशी करून या प्रकरणांमध्ये शिरूर पोलिसांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे. नाहीतर मस्साजोग सारखे प्रकरण शिरूर तालुक्यात घडल्याशिवाय राहणार नाही. शिरूर तालुक्यात अवैध पिस्टल बाळगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. याकडे शिरूर पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
माझ्या भावांना घेवून सरपंचा बरोबर फिरतो , मी तुझ्यासाठी काय कमी केले ,माझ्या विरोधात वागतो यामुळे मी तुझा मर्डर करणार आणि त्या सरपंचालाही सोडणार नाही, यासाठी मी सहा लाखांची सुपारी दिली आहे. अशी धमकी माळवाडी (ता.शिरूर) येथील सुरेश दिगंबर भाकरे यांनी योगेश निवृत्ती भाकरे यांना फोनद्वारे दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत योगेश भाकरे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
धमकी देणारा व्यक्ती हा योगेश व सोमनाथ भाकरे या दोघांचाही नातेवाईक आहे. मी अनेकदा मदत करूनही योगेश माझ्या विचारांच्या विरोधी लोकांसोबत राहतो तसेच माझ्या विरोधात माझ्या भावांना घेवून सरपंचाबरोबर फिरतो, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीवेळी सरपंच सोमनाथ भाकरे आणि सुरेश भाकरे एकमेकांच्या विरोधी पॅनल मधून लढलेले आहेत. याचा राग मनात धरून सुरेश भाकरे यांनी योगेश भाकरे व नातेवाईकांनाही फोन करून योगेशची सुपारी दिल्याबाबत स्वतः सांगितले आहे. याबाबतची कल्पना पोलिसांना दिली असून योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी सरपंच सोमनाथ भाकरे यांनी केली आहे.
माळवाडी (ता. शिरूर) येथील शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष योगेश भाकरे व सरपंच सोमनाथ भाकरे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी आल्याने शिवबा संघटना आक्रमक झाली असून संघटनेतर्फे सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी योग्य पावले उचलावीत व कडक कारवाई करावी.अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण ताजे असताना राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पाहता हा प्रकार योग्य नाही. गावाचे प्रतिनिधीत्व करताना निवडणुकीनंतर राजकीय मतभेद विसरून काम करावे लागते. मात्र अशा प्रकारे थेट सरपंचांना लक्ष केले जात असेल तर सरपंच सेवा महासंघातर्फे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून दाद मागणार
विकास कडू पाटील,
अध्यक्ष: पुणे जिल्हा सरपंच सेवा महासंघ
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…