शिरूर तालुका

शिरुरच्या सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचे भव्य स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात पडले पार

शिरूर (अरुणकुमार मोटे): १ फेब्रुवारीची रम्य संध्याकाळ, ग्राऊंडवर भव्य उभारलेला रंगमंच, प्रेषकांनी प्रंचड तुडुंब भरलेल मैदान ,रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, बालकलाकारांची लगबग, धावपळ, अनेक विशेष मान्यवरांची उपस्थिती आणि बालकलावतांच्या अदाकारीने प्रेषकांच्या टाळ्यांच्या होणारा कडकडाट.. हे विलोभनीय दृश्य होते शिरूर शहरातील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे .. या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असून केजी पासून ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय मनापासून दिलखुलासपणे सादर केले .अगदी साठच्या दशकापासून ते आजच्या लोकप्रिय गाण्यांपर्यंत कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले .एकापेक्षा एक कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या. प्रेक्षकांनी टाळ्याच्या कडकडात विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष अनिलजी पायस आणि संस्थेच्या सचिव नॅन्सी पायस तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी अतिशय आत्मविश्वासाने सादर केले. प्रभावी सूत्रसंचालनाचा आदर्श वस्तूपाठच या विद्यार्थ्यांनी घालून दिला. सर्व इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कलाकृती सादर केल्या होत्या. ‘न भूतो न भविष्यती ‘ असे हे स्नेहसंमेलन होते. असे उद्गार उपस्थित प्रेक्षकांनी काढले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले प्रेक्षक या नेत्रदिपक सोहळ्याने भारावून गेले होते. याच कार्यक्रमात विविध स्पर्धत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमासाठी न्यायमूर्ती दत्तात्रय डोमले, गटविकास अधिकारी महेश डोके, गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर , सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक करांडे,आदर्श माजी सरपंच अरुणजी घावटे, सरपंच शिल्पा गायकवाड माजी सरपंच विठ्ठल घावटे ,नाथाभाऊ पाचर्णे, मनसेचे अविनाश घोगरे, क्लेरीसा मास्करीनस , पीटर गुडीनो,अँलन पायस, जेष्ठ पत्रकार नितीन बारवकर, अरुणकुमार मोटे, संस्थेचे अध्यक्ष अनिल पायस, सचिव नॅन्सी पायस, संस्थेचे सदस्य सुनील भाकरे ,अनिता वेगस व मान्यवर, पालकवर्ग मोठया उपस्थित होते.संस्थेच्या सचिव नॅन्सी पायस यांनी सर्व उपस्थितांचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर वर्गांचे आणि बालकलावंतांचे आभार मानले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago