शिरूर (अरुणकुमार मोटे): कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पत्नीनेच दोन अनोळखी व्यक्तींना पतीवर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरात घडली असून या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम वाल्मीक टोनगे (वय ३६, रा. कोहकडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास शिरूर शहरातील श्री हाइट्स सोसायटीसमोर, शिरूर–रामलिंग रस्त्याच्या कडेला ही घटना घडली.
फिर्यादी यांची पत्नी चित्रा विक्रम टोनगे (सध्या रा. फाकटे, ता. शिरूर) हिने “पोटगी संदर्भात चर्चा करू” असे सांगून त्यांना न्यायालयातून आपल्या मागे येण्यास सांगितले. त्यानुसार दोघे मोटारसायकलवरून जात असताना रस्त्याच्या कडेला झाडाखाली दोन अनोळखी इसम स्प्लेंडर मोटारसायकलसह उभे होते. पत्नी त्यांच्याजवळ जाऊन बोलू लागल्याने फिर्यादीही तिथे गेले.
यावेळी चित्रा टोनगे हिने फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करत त्या दोन इसमांना मारहाण करण्यास सांगितले. त्यानंतर एका इसमाने वाहनाच्या वायरच्या साहाय्याने, तर दुसऱ्या इसमाने कंबरेच्या बेल्टने फिर्यादीच्या पाठीवर व हातावर मारहाण करून दुखापत केली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर करीत आहेत. यातील आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…