न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर आज बुधवार (दि 29) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चारचाकीच्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात पती-पत्नी प्रवास करत होते, त्यापैकी पत्नी शोभा रामदास इथापे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहनाला कोणीतरी आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जोरात आदळले. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की गाडीचा समोरचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, शोभा इथापे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी पतीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वेगमर्यादा पाळली जात नसल्याने आणि काही ठिकाणी रस्त्यांची स्थिती धोकादायक असल्याने असे अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे. याबाबत शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून इथापे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…
पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…
मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…