क्राईम

शिरुर तालुक्यात चाकूचा धाक दाखवत बँक खात्यातुन पैसे जबरदस्तीने केले ट्रान्सफर अन…

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये दोन जणांवर गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील यश इन चौकात राहणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवत, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या बँक खात्यातील पैसे जबरदस्तीने स्वतःच्या बँक खात्यात जबरदस्तीने घेतल्याने दोन जणांवर गुन्हा दाखल झाला असुन योगेश सुनिल बारवकर (वय 27 वर्ष) रा.शिरुर बायपास पाषाणमळा (ता. शिरुर) जि.पुणे आणि गौतम छगन शिंदे (वय 30 वर्ष) रा.पिंपरी कोलंदर ता.श्रीगोदा जि.अहमदनगर सध्या रा.यशईन चौक कारेगाव (ता. शिरुर) जि.पुणे अशी त्यांची नावे आहेत. याबाबत रवींद्र बाबन जेना (वय 44 वर्ष) रा.कारेगाव, यश-इन चौक मूळ रा. बारभाटिया, ता. कोमलदा जि. बालेश्वर, राज्य ओडिसा यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश इन चौक येथे योगेश बारवकर व गौतम शिंदे यांचे चायनीजचे हॉटेल असुन फिर्यादी रवींद्र बाबन जेना यांनी हॉटेल व्यवसायाकरिता काढलेल्या कर्जाचे 1 लाख रुपये रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले असताना त्यापैकी 89 हजार रुपये फिर्यादीचा मोबाईल काढुन घेत त्याला चाकूचा धाक दाखवत हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत आरोपी योगेश सुनील बारवकर याने जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले. सदरबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला अथवा कुणाकडे तक्रार केली तर “उलटा टांग के काट के फेक दूंगा” असे म्हणून ओप्पो कंपनीचा मोबाईल घेऊन गेला.

त्यामुळे फिर्यादीने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला धाव घेत वरील दोघांच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी दोन्ही आरोपिंना अटक करुन शिरुर न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 दिवस ago

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…

2 दिवस ago

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे.…

2 दिवस ago

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

2 दिवस ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

2 दिवस ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

4 दिवस ago