मुख्य बातम्या

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे. मला दम देण्यापेक्षा अजित पवारांनी कांद्याला चांगला बाजार द्यावा. दुधाचे दर वाढवुन द्यावेत. मी शरद पवार साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मी साहेबांसोबत गेलो म्हणुन जर तुम्ही या थराला जात असाल तर ते योग्य आहे का…? हे जनता ठरवेल असं प्रत्युत्तर आमदार अशोक पवार यांनी अजित पवारांना दिलं.

 

घोडगंगा साखर कारखान्याच्या संदर्भात बोलताना अशोक पवार म्हणाले, मागच्या वर्षी घोडगंगा साखर कारखान्याने 55 कोटी शॉर्ट टर्म (ST Loan) कर्ज घेतलं, ते सर्व कर्ज भरल. त्यानंतर आम्हाला नवीन कर्ज मिळणार होत. शिवाय या सरकारने सहा कारखान्यांना थकहमी दिली, राज्य बँकेचं कर्ज दिलं. तर काहींना NCDC चं कर्ज दिलं. आम्ही पण त्या प्रतिक्षेत होतो की त्यांच्यासारख आम्हाला पण कर्ज द्यावं. कारण आमचं खात NPA मध्ये नसल्याने आमचं खात व्यवस्थित होत.

 

जर जुन-जुलै महिन्यात कारखान्याचा एक रुपया थकीत नव्हता. तर आमचं कर्ज का अडवलं…? असा प्रश्न अशोक पवारांनी उपस्थित करत आम्ही वेळोवेळी विनंती करत असताना आम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ केली. परंतु राजकारण बदलल्याने मी शरद पवारांसोबत गेलो म्हणुन हि अडवणूक झाली का…? असं आम्हाला वाटायला लागलं.

 

तसेच शरद पवार साहेबांना मी पित्याच्या जागी मानतो. ते माझ्या हृदयातल स्थान आहे. मी कधीही मंत्रीपद सोडा मला पवार साहेबांनी पुन्हा आमदारकीचं तिकीट दिलं नाही. तरी मला काहीच अडचण नाही. मला साहेबांसोबत राहायचंआहे हे मी जाहीर सभेत सांगितलं. सन 1976 माझ्या कॉलेज जीवनापासुन मी पवार साहेबांवर नितांत प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मी माझी निष्ठा का सोडू असेही ते म्हणाले. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी अशी दमबाजी करणे योग्य नसल्याचे पवार म्हणाले.

;अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो ; अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

14 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago