शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे ज्येष्ठ व्यक्तीला एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएमची आदलाबदल करुन काही पैसे कधुअन घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जनसेवा बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बाळासाहेब थोरात आलेले असताना त्यांच्या मागे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने थोरात यांचे पैसे काढून झाल्यावर स्वतः थोरात यांचे एटीएम मशीन मधून काढून घेऊन त्यांच्या हातात दिले. दरम्यान सदर व्यक्तीने हातचलाखी करत दुसरेच एटीएम थोरात यांच्या हातात दिले. त्यांनतर काही वेळाने थोरात यांच्या एटीएम मधून 2 वेळा 19 हजार रुपये काढण्याबाबतचा मेसेज थोरात यांना आला.
त्यामुळे सदर व्यक्तीकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने बाळासाहेब कोंडीबा थोरात (वय ५५) रा. कमेवाडी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहे.
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…
शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…
मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…