क्राईम

कोरेगाव भीमात भंगार वाल्याला मारहाण करत लुटले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील येथील एका भंगार व्यावसायिकास तीन अज्ञात युवकांनी मारहाण करत लुटून मारहाण करणाऱ्या युवकांनी त्यांची दुचाकी घटनास्थळी सोडून पलायन केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील भंगार व्यावसायिक रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानात झोपलेले असताना 3 युवक दरवाजाची तार तोडून आतमध्ये आले. यावेळी दुकानात झोपलेल्या फारुख खान याला जबर मारहाण करत दुकानात ठेवलेले 10 हजार रुपये काढून घेतले. यावेळी पैसे घेण्यास नकार करणाऱ्या खान याला ढकलून देत चोरटे बाहेर आले आसरा खान याने आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी त्यांची एम एच १२ आर डी ७१३३ हि दुचाकी सोडून पलायन केले.

दरम्यान येथील नागरिकांनी जखमी फारुख खान याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात पाठवून दिले. याबाबत फारूक जियाउल्ला खान (वय २४) रा. सावली हॉटेल जवळ कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. गणेश पेठ पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई नीरज पिसाळ हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

6 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

6 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

6 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

6 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

7 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

12 तास ago