शिरूर तालुका

शिंदोडीच्या मुलींची तालुकास्तरीय स्पर्धेत बाजी

जिल्हास्तरीय स्पर्धेत 8 मुली आणि 3 मुलांची निवड

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत चांदमल ताराचंद बोरा कॉलेज शिरुर या ठिकाणी नुकत्याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शिंदोडी येथील कै हरुबाई उमाजी शितोळे विद्यालयातील आठ मुली व तीन मुलांची बारामती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुरेश बांबळे यांनी दिली.

जिल्हास्तरीय निवड झालेल्या विद्यार्थिनी 

14 वर्ष रिले प्रथम क्रमांक

1) स्नेहा पवार 2) तेजस्विनी वाळुंज,

3) कार्तिकी गायकवाड 4) वैष्णवी खेडकर

जिल्हा निवड (मुली)

1)अदिती वाळुंज, प्रथम क्रमांक (भाला फेक)

2) गायत्री वाळुंज, प्रथम क्रमांक, (3 किमी चालणे)

3) तेजस्विनी वाळुंज प्रथम क्रमांक, (उंच उडी)

4) कार्तिकी गायकवाड, द्वितीय क्रमांक (गोळा फेक)

जिल्हा निवड (मुले)

1) अमोल शिंदे, प्रथम क्रमांक (5 किमी चालणे)

2) रोहन दांगट, द्वितीय क्रमांक, (5 किमी चालणे)

3) चैतन्य भोस, द्वितीय क्रमांक (उंच उडी)

तालुका स्तरीय स्पर्धेत विजयी खेडाळू

1) साक्षी अनुसे, तृतीय क्रमांक (गोळा फेक व उंच उडी)

2) स्नेहा पवार, तृतीय क्रमांक (उंच उडी)

मुलांमध्ये साई काळे, तृतीय क्रमांक (तिहेरी उडी)

या मुलांना शाळेतील क्रीडा शिक्षक गणेश भोस, चंद्रकांत शिंदे, शितल भगत यांनी मार्गदर्शन केले. शिंदोडी ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

5 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

5 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

5 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

5 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

6 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

11 तास ago