क्राईम

विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा अत्याचार

संभाजीनगर: चुलीत जाळण्यासाठी जळतन आणण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर तिन सख्ख्या भावांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना २० जून रोजी पारुंडी ता. पैठण येथे घडली असून पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून काल गुरुवारी नितीन बाबासाहेब निसर्गे, संजय बाबासाहेब निसर्गे, विजय बाबासाहेब निसर्गे (सर्व रा. पारुंडी ता. पैठण) या तिन्ही नराधम भावांविरुद्ध ब-ला-त्का-राचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातल्या पारुंडी येथील २२ वर्षीय विवाहिता २० जून रोजी दुपारी गट क्रमांक ७३ मध्ये बांधावर असलेले मोसंबीच्या झाडांचे जळान आणण्यासाठी गेली असता तिथे उभे असलेल्या तिन्ही सख्ख्या भावांनी ति एकटी असल्याचे पाहून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करून घटनेबाबत घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

घटनेनंतर पीडिता घरी गेल्यावर घडलेला प्रकार पती व सासूला सांगितला. आपली समाजात बदनामी होईल म्हणून त्यांनी दोन दिवस तक्रार दाखल करण्याचे टाळले. मात्र, काल गुरुवारी सायंकाळी तिघा भावांविरुद्ध अखेर पीडितेने पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पो.नि. संतोष माने, महिला दक्षता व भरोसा सेलच्या सहायक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी ”in camera” पीडित महिलेचा जवाब नोंदवून तिघा भावांविरुद्ध ब ला त्का राचा गुन्हा दाखल केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

11 तास ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

17 तास ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

2 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

3 दिवस ago

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती ,…

3 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसीत कंपनीचे गोदाम जळून खाक

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील…

3 दिवस ago