क्राईम

चुलत्याकडून पुतणीवर वारंवार अत्याचार; आरोपी अटकेत, ७ दिवस पोलीस कोठडी

पुणे: लोणी काळभोर परिसरात नातेसंबंधांनाच काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सख्ख्या चुलत्याने पुतणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी २२ वर्षीय पीडितेच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली आहेत. एक दिवस त्या कामावरून नेहमीपेक्षा लवकर घरी आल्या असता त्यांना आपल्या दीराने मोठ्या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करत असल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

त्यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, आरोपी चुलता धमकी देऊन वारंवार अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले. भीतीपोटी हा प्रकार दीर्घकाळ कुणालाही सांगितला नसल्याची कबुलीही तिने दिली. या धक्कादायक माहिती मिळताच पीडितेच्या आईने तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या निंदनीय घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago