आरोग्य

फुप्फुसात जमा झालेला कफ झटक्यात येईल बाहेर

सर्दी-खोकला फारच कॉमन समस्या आहेत. पण जर फुप्फुसांमध्ये कफ जमा झाला तर स्थिती फारच गंभीर होते. खोकून खोकून व्यक्तीची हालत खराब होते. छातीत वेदनाही होतात. फुप्फुसात कफ जमा झाल्याने इन्फेक्शन किंवा सीओपीडी आजारही होऊ शकतो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, छातीत जमा झालेला कफ तुम्ही घरातील एक गोष्ट वापरून बाहेर काढू शकता.

या आयुर्वेदिक उपायाने फुप्फुसांमध्ये जमा झालेला कफ एका झटक्यात बाहेर निघेल. हा उपाय लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठीही फायदेशीर आहे. नॅचरोपॅथी स्पेशलिस्ट डॉ. निताशा गुप्ता यांच्यानुसार, बदलत्या वातावरणात हा उपाय नक्की करा. याने सर्दी, खोकला ताप लगेच दूर होण्यास मदत मिळेल. सर्दी, खोकला, ताप या समस्या दूर करण्यासाठी मोठ्या वेलचीचा वापर करू शकता. याचा वापर करून लहान मुले असो वा मोठे त्यांच्या छातीत जमा झालेला कफ दूर होण्यास मदत मिळते.

सर्दी खोकल्याचं औषध

आधी १० ते १२ मोठ्या वेलची घ्या.

आता या पॅनमध्ये टाकून चांगल्या भाजा.

आता वेलची काही वेळ थंड होऊ द्या.

नंतर या वेलचीची पावडर तयार करा.

हे पावडर चांगलं गाळून घ्या.

गाळून झाल्यावर मोठ्या वेलचीच साफफेकण्याची चूक करू नका. यानेही तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल. या सालीचा तुम्ही हर्बल चहा तयार करू शकता. याच्या सेवनाने इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

पावडरने तयार करा कफाचं औषध

गाळलेलं पावडर १ ते २ महिने तुम्ही स्टोर करून ठेवू शकता.

६ महिने ते १ वर्षाच्या मुलांना ३ ते ४ चिमुट पाडवर थोड्या मधामध्ये टाकून सकाळी, दुपारी आणि रात्री खायला द्या.

१ वर्ष ते ५ वर्षाच्या मुलांना एक चतुर्थांश चमचा पावडर सकाळी आणि सायंकाळी मधासोबत द्या.

5 वर्ष ते वयस्कांना १ चमचा पावडर सकाळी आणि सायंकाळी मधासोबत मिक्स करून द्यावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

15 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

15 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

15 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago