क्राईम

पुणे नगर महामार्गावर चक्क टेम्पो गेला दुभाजकावर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाची उंची कमी झालेली असल्याने अनेक अपघात होऊन कित्येकांचा जीव गेलेला असताना पहाटेच्या सुमारास सदर रस्त्यावर टेम्पो दुभाजकावर जाऊन अडकला त्यामुळे टेम्पो विरुद्ध बाजूला जाण्यापासून रोखला गेल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात टेम्पोचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांची उंची कमी झालेली असल्याने अनेक अपघात घडलेले असून कित्येकदा वाहने दुचाजाकावरुन रस्ता ओलांडून विरुद्ध बाजूला येऊन अपघात होत अनेकांचे जीव गेलेले आहेत, तर काही वेळा एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देखील काही ठिकाणी सुरु करण्यात आलेले असताना आज पहाटेच्या सुमारास चाकण बाजूने आलेला टेम्पो एम एच १६ सि डी ७४९३ हा अहमदनगर बाजूकडे जात असताना चालकाला कमी उंचीचा दुभाजक न दिसल्याने टेम्पो चक्क दुचाजाकावर गेला. यावेळी टेम्पो दुभाजकाला अडकल्याने विरुद्ध बाजूला जाण्यापासून रोखला गेला त्यामुळे अनर्थ टळला अन्यथा समोरुन आलेल्या वाहनावर टेम्पो आदळून मोठा अपघात घडला असता सकाळच्या सुमारास शिक्रापूर पोलिसांनी दोन क्रेनच्या मदतीने सदर टेम्पो बाजूला करत रस्ता मोकळा करुन घेतला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

2 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

9 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago