क्राईम

उभ्या असलेल्या टेम्पोतून 53 हजाराचा पॉपकॉर्नचा साठा चोरीला, अज्ञात चोरांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुरावनगर भागात उभ्या असलेल्या टेम्पोमधून अज्ञात चोरट्याने तब्बल 53 हजार 532 रुपयांचा पॉपकॉर्नचा साठा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादी दत्तात्रय भाउसाहेब देवकर (वय ३१) व्यवसाय – चालक, रा. चांडोली गाव, ता. खेड, जि. पुणे यांनी याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, ही चोरी ६ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० ते ७ ऑगस्ट सकाळी ५:१० या वेळेत घडल्याचे निदर्शनात आले आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक लेलँड टेम्पो एम एच१४जे पी ६७८६ हा टेम्पो शिरूर शहरातील कोळपे हॉस्पिटलजवळ, बाबुरावनगर येथे लावलेला होता. त्या टेम्पोमधून अज्ञात चोराने १५ सिलबंद गोण्या प्रत्येकी ३० किलो वजन आणि १४किलो वजनाचा बॉक्स असा एकूण ४६४किलो वजनाचा पॉपकॉर्न माल चोरून नेला आहे.या पॉपकॉर्न मालाची एकूण किंमत ५३ हजार ५३२ रुपये असून, प्रत्येक गोणीवर स्वतंत्र किंमत नमूद केले होती. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शकाखाली पुढील तपास पोलीस हवालदार भगत हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

13 तास ago