महाराष्ट्र

मुंबई, हिंदू सण ‘रक्षाबंधन’ दिवशी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे; अ‍ॅड. अमोल मातेले

मुंबई: भारतीय परंपरेतील बंधुत्वाचे प्रतीक आणि पवित्र हिंदू सण – रक्षाबंधन यावर्षी ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जात आहे. त्याच दिवशी “ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट” ही महत्त्वाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे.

रक्षाबंधन हा सण बहिणी आणि भावामधील अतूट प्रेम, विश्वास व सुरक्षा यांचे प्रतीक आहे. वर्षभर बहिण भावाची वाट पाहते. अशा दिवशी बहुसंख्य विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्याची सक्ती करणे म्हणजे त्यांच्यावर भावनिक अन्याय करणे होय.

सरकारने एकीकडे सुट्टी जाहीर करून रक्षाबंधनाच्या महत्त्वाला मान्यता दिली आहे आणि दुसरीकडे अशाच दिवशी परीक्षा घेणे ही थेट विरोधाभासी आणि असंवेदनशील भूमिका आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यामागे युक्तिवाद विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक आणि मानसिक आरोग्याचा विचार: परीक्षेच्या दडपणात रक्षाबंधन साजरा न करता अनेक उमेदवार मानसिक तणावात जातील.कौटुंबिक सलोख्याला तडा: बहिणींसोबतचा रक्षाबंधनाचा क्षण गमावणे आयुष्यभर सल देणारे ठरू शकते.भावनांचा अपमान हे केवळ एक शैक्षणिक मुद्दा नसून, धार्मिक आणि सामाजिक भावना जपण्याचाही विषय आहे.

गैरव्यवस्थापनाचा संशय: जाणूनबुजून धार्मिक सणांवर परीक्षा ठेवून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा हा प्रकार नियोजनाचा भाग तर नाही ना? याची चौकशी व्हावी.

सरकारचे दुटप्पी धोरण उघड

हिंदुत्वाच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करणारे सरकार स्वतःच्या कृतीत मात्र हिंदू सणांना दुय्यम स्थान देत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. आम्ही विचारतो सणाच्या दिवशी परीक्षा घेण्याची इतकी काय घाई होती? हे सरकारला विचारल्याशिवाय राहवत नाही की, विद्यार्थ्यांपेक्षा मोठं अजेंडा तुम्हाला वाटतंय का?

राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरद पवार पक्षाच्या वतीने आम्ही भारत सरकार व संबंधित परीक्षा प्राधिकरणाला कळकळीची विनंती करतो की “रक्षाबंधनाच्या दिवशी आयोजित केलेली ‘ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट परीक्षा’ त्वरित पुढे ढकलावी,”आणि हिंदू भावनांचा आदर राखून भविष्यात कोणत्याही धार्मिक सणाच्या दिवशी परीक्षा आयोजित करू नये.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

4 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

10 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

11 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

11 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

11 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago