क्राईम

बेट भागात शेतकऱ्यांच्या पशुधनावर चोरांचा डोळा; म्हैस व शेळ्यांची केली चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील माळवाडी येथून मंगळवारी (दि. ५) रात्री चोरांनी दोन शेळ्यांची चोरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अविनाश लक्ष्मण भाकरे (वय ३५), रा. माळवाडी, टाकळी हाजी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

भाकरे यांच्या शेळ्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या असताना, चोरांनी दोन शेळ्या चोरून नेल्या. चोरून नेलेल्या शेळ्यांची एकूण किंमत अंदाजे ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार शिवाजी बनकर तपास करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निमगाव दुडे आणि टाकळी हाजी परिसरातून म्हैस चोरीची प्रकरणे घडली होती. त्या घटनांचा तपास अद्याप अपूर्ण असतानाच पुन्हा एकदा पशुधन चोरीची घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

एकीकडे बिबट्याचे हल्ले आणि दुसरीकडे चोरट्यांची वाढती धाडसी कृत्ये पाहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाचे रक्षण करणे मोठे आव्हान ठरत आहे. पोलिसांनी या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ तपास पूर्ण करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.या चोरीच्या घटनांचा कसून तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक शिरूर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

6 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

12 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

13 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

13 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

13 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

13 तास ago