Shikrapur Police Station
शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन बसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचे ३ लाख ३० हजार रुपये अज्ञात महिलेने लांबवले असल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अहमदनगर येथून प्रवास करत पुणे येथे राजाराम गुलाखे येत असताना त्यांनी त्यांच्या जवळील पिशवीमध्ये ३ लाख ३० हजार रुपये ठेवलेले होते. रांजणगाव गणपती येथे बस आल्यानंतर काही महिला बसमध्ये चढल्या आणि गुलाखे यांच्या शेजारी बसल्या बराच वेळ महिला काही हालचाल करत होत्या. काही वेळाने महिला शिक्रपुरे येथे बस मधून उतरल्या.
दरम्यान गुलाखे यांची पिशवी पाहिली असता पिशवी फाटलेली दिसल्याने त्यांनी पिशवीमध्ये पाहणी केली असता पिशवीतील ३ लाख ३० हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसले. त्यामुळे सदर महिलांनी चोरी केल्याचे निदर्शनास आल्याने राजाराम बाळू गुलाखे (वय ६०) रा. देऊळगाव सिद्धी ता. अहमदनगर जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…