शिरूर तालुका

आरणगाव- वडगाव बांडेतील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली

नदीच्या पुराने दोन तालुक्यांचा संपर्क दोन दिवसापासून तुटला

शिक्रापूर: आरणगाव (ता. शिरुर) येथील वडगाव बांडे ता. दौंड या गावाच्या मध्यभागी असलेल्या भीमा नदीला सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पूर आलेला असल्याने येथील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांच्या दळणवळण चा प्रश्न निर्माण झाला आहे.

आरणगाव (ता. शिरुर) येथील भीमा नदीवर बंधारा असून सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा नदीला आलेल्या पुरामुळे येथील नदीवरील पूल पाण्याखाली गेला. तसेच सदर बंधाऱ्याला कठडे नसल्याने येथून वाहतूक करणे धोकादायक झाले असल्याने येथून धोकादायक पद्धतीने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. मात्र येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने या ठिकाणच्या शिरुर व दौंड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून येथील दुग्धव्यावसायिक व शाळकरी मुलांसह कामगार व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

unique international school

रस्ता वाहतुकीस बंद व वाहनचालकांवर कारवाई: संतोष लेंडे (पोलीस पाटील)
आरणगाव व वडगाव बांडेला जोडणारा भीमा नदीच्या बंधाऱ्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने सदर रस्ता बंद ठेवण्यात आलेला असून सदर पुलावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस हवालदार किशोर तेलंग व अमोल चव्हाण यांनी दंडात्मक कारवाई केली असल्याने पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

4 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

8 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

8 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago