क्राईम

पुणे हादरलं! सोन्याच्या दागिन्यांच्या वादातून पतीकडून पत्नीचा चाकूने खून

पुणे: पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई (ता. हवेली) परिसरात कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले असून, सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून संतप्त झालेल्या पतीने पत्नीचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, खुनात वापरलेला लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय 19, रा. शिरसवडी, ता. हवेली) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून, शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय 30, रा. बकोरी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता हिचे काही सोन्याचे दागिने गहाण ठेवलेले होते. हे दागिने सोडवून देण्याची मागणी ती पतीकडे वारंवार करत होती. याच कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचे समोर आले आहे.

घटनेच्या दिवशी आरोपी शैलेंद्र याने नम्रता हिला वाडेबोल्हाई परिसरात बोलावून घेतले. तेथे पुन्हा एकदा दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या शैलेंद्र याने त्याच्याकडील लोखंडी चाकूने नम्रताच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार केले. या हल्ल्यात नम्रता गंभीर जखमी झाली असून तिचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी अटकेत, गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शाहरुख दस्तगीर पठाण (वय 23, रा. शिरसवडी, वाडेबोल्हाई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपी शैलेंद्र व्हटकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन खुनात वापरलेला चाकू जप्त केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

आष्टीत सिनेस्टाईल मंगळसूत्र चोरी

दरम्यान, बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातही गुन्हेगारीची आणखी एक घटना समोर आली आहे. किनारा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या चोरांनी सिनेस्टाईल पाठलाग करत स्कूटीवरील महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

या घटनेदरम्यान महिला खाली पडून जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चोरी करून पळून जाणारा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

11 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

17 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

18 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

18 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

18 तास ago