मुख्य बातम्या

घोडनदी येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे भव्य उद्घाटन

शिरुर (तेजस फडके): घोडनदी (ता.शिरुर) येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे तसेच अरिफ डॉक्टर यांच्या शुभहस्ते रविवार (दि 25) रोजी संपन्न झाले. या ऐतिहासिक प्रसंगी न्यायव्यवस्थेतील मान्यवर, वकील बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड उदय सरोदे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना पुणे जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी सांगितले की, शिरुर ते पुणे हे अंतर लक्षात घेता अतिशय वर्दळीचा मार्ग असून पक्षकारांना न्यायालयीन कामकाजासाठी मोठा वेळ व खर्च करावा लागत होता. घोडनदी (शिरुर) येथे न्यायालय सुरु झाल्याने पक्षकारांना वेळेत व सुलभ न्याय मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

यावेळी महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड राजेंद्र उमाप सर यांनीही घोडनदी येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरु होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. तसेच या उद्घाटन समारंभास अ‍ॅड हर्षद निंबाळकर, अ‍ॅड विठ्ठल कोंडे देशमुख, अ‍ॅड ए यु पठाण सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

घोडनदी व परिसरातील नागरिक, पक्षकार व वकील वर्गासाठी हे न्यायालय सुरू होणे ही अत्यंत आनंदाची व दिलासादायक बाब असून, यामुळे न्यायप्रक्रिया अधिक गतिमान व सुलभ होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

12 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

19 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

19 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

3 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

3 दिवस ago