क्राईम

पुन्हा सैराट! बहिणीला पळवून नेणाऱ्याची भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करुन हत्या…

जीव जाताच आरोपीने केला मृतदेहाजवळ जल्लोष…

औरंगाबाद: पुन्हा ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, 3 वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेऊन लग्न करणाऱ्या तरुणावर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या केल्याची घटना उघडीस आली असून औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवसांत दोन खून झाल्यामुळे औरंगाबाद जिल्हा हादरला आहे. बापू खिल्लारे (वय 30) असे मृत युवकाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तीन वर्षांपूर्वी बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने औरंगाबाद पुणे महामार्गावरील दहेगाव बंगला जवळ इसारवाडी फाटा येथे बहिणीच्या पतीची भर रस्त्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करुन ही निर्घृण हत्या केली आहे.

खून करुन आरोपीने केला जल्लोष

संतापजनक म्हणजे कुऱ्हाडीने वार केल्यानंतर बहिणीच्या पतीचा जीव गेल्याची आरोपीने खात्री केली आणि त्यानंतर रस्त्यावरच जल्लोष केल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी दिली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

काही तासातच आरोपी ‘ प्रिन्स ‘ ला ठोकल्या बेड्या

याप्रकरणी वाळूज पोलिसांनी अवघ्या दोनच तासात गतीने चक्र फिरवून आरोपीला नेवासा परिसरातून ताब्यात घेतले; त्याने गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड कोठे टाकली याचा शोध वाळूज पोलिस रात्री उशिरा पर्यंत घेत आहे अशी माहिती पोनि सचिन इंगोले यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बीटरूट फायदेशीर

बीटरूट ही प्रत्येक हंगामात उपलब्ध असलेली भाजी आहे. लोक ते सॅलड किंवा ज्यूसच्या स्वरूपात खातात.…

3 तास ago

शिरूरमध्ये एकाला लोखंडी रॉडने मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नवीन मार्केट यार्ड घावटे कॉम्प्लेक्स येथे वाहन कर्जाच्या झालेल्या व्यवहाराचा…

22 तास ago

शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पाहा नावे…

पुणे: पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या चार गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या…

1 दिवस ago

Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…

छत्रपती संभाजीनगर : एका एसटी बसमध्ये दोन वृद्धांची फ्री स्टाईल हाणामारी झाली. संबंधित घटनेचा व्हिडिओ…

1 दिवस ago

कारेगाव मध्ये सगळे दिग्गज एकत्र असुनही अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहुल गवारे यांची एकाकी लढत

कारेगाव (तेजस फडके) शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटूनही शिरुर तालुक्यात अजुनही…

2 दिवस ago

रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त राष्ट्रीय…

2 दिवस ago