क्राईम

शिरुर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान…

एका रात्रीत केली तीन विद्युत रोहीत्रांची चोरी
सविंदणे (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हाण दिले असून, एका रात्रीमध्येच तीन विद्युत रोहीत्रांची चोरी केली आहे.

शिरूरच्या बेट भागात विद्युत रोहीत्र चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले असून, शिरूर पोलिसांनी महावितरण सोबत नुकतीच कवठे येमाई येथे १२ जून रोजी संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीसाठी पत्रकारांना जाणुणबुजून आमंत्रित केले नव्हते. या बैठकीत मोठ्या थाटामध्ये विविध उपाययोजना राबवण्याचे ठरले. लवकरच चोरटे जेरबंद करण्याचे आश्वासन दिले.

परंतु, चोरटयांनी आमदाबाद (ता. शिरूर) येथील बंधाऱ्याजवळील (ता. १३) रात्रीच्या सुमारास एकाच रात्री तीन विद्युत रोहीत्र फोडून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. जवळपास ४०० विद्युत रोहित्र चोरीला गेले असून पोलिस यंत्रणेला चोर शोधण्यास सपशेल अपयश आले आहे. शिरूर पोलिसांनी पत्रकारांना माहिती कुठून मिळते याचा शोध घेण्यापेक्षा आपला वेळ विदयुत रोहीत्र चोरटयांना शोधण्यात घालवल्यास चोर नक्की गजाआड होतील.

शिरूर शहर व परिसरात बोकाळलेले अवैध धंद्यांनी थैमान घातले असून, पोलिस प्रशासणाचा वचक राहिला नाही. पोलिस उपविभागीय आधिकारी प्रंशात ढोले हे तरुण आधिकारी आहे. त्यांच्याकडून नागरीकांना खुप अपेक्षा असून त्यांनी पुढाकार घेऊन या चोरटयांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
(क्रमशः)

शिरुरच्या बेट भागात वाढत्या रोहीत्र, केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर पोलीस,महावितरणची संयुक्त बैठक

शिरुर; रांजणगाव येथील ‘अथर्व ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर उचकटून १६ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला…

शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी अखेर गजाआड…

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…

सोशल मीडियावर तलवार दाखवली; शिरूर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लवंग आणि लिंबाचं पाणी, आरोग्यासाठी ठरते जादूई! पाहा तिखट-आंबट चवींचा खास उपाय

लिंबू आणि लवंग या दोन्ही गोष्टींचा वापर कशात ना कशात रोज भारतीय घरांमध्ये केला जातो.…

7 तास ago

संधीवात आणि सांधेदुखीत फायदे मंद आहे पंतजलीचे हे औषध

संधीवात, ज्यास इंग्रजीत Arthritis म्हटले जाते. ज्यात सांध्यात सूज आणि तीव्र वेदना होतात. शरीरातील रोगप्रतिकारक…

7 तास ago

शरीर सांगतं फुप्फुसं कमकुवत होत असल्याची लक्षण

जसजसं आपलं वय वाढत जातं शरीरही हळूहळू कमजोर होतं. त्यामुळे वाढत्या वयात लवकर थकवा येण्याची…

7 तास ago

‘घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा; विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी…

7 तास ago

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता; धिरज देशमुखांची सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी

मुंबई : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा…

7 तास ago

‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’; एकनाथ शिंदे

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान अकोला: कमी पर्जन्यमान आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे…

7 तास ago