क्राईम

शिरूर पोलिसांत माजी आमदारासह अकरा जणांवर गुन्हा

शेतकऱ्याच्या नावावरून बँकेचे कर्ज काढून पन्नास लाखांची फसवणूक

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील शेतकरी सचिन बाळासाहेब गरुड यांच्या जमिनीवरून सहकारी संस्थेतून कर्ज काढून, प्रत्यक्ष कर्जदारास रक्कम न देता संगनमताने लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१९ मध्ये व्यवसाय वाढीसाठी सचिन गरुड व त्यांच्या दोन मित्रांनी अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी, सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था, सासवड येथे कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांच्या गणेगाव दुमाला येथील शेतीची जमीन गहाण ठेवण्यात आली. बँकेने अनेक कागदपत्रे घेतली व वेळोवेळी आश्वासन देत टाळाटाळ केली.

शेवटी कर्ज मंजूर झाले असे दाखवून ६५ लाख रुपयांची रक्कम नोंदवली गेली. मात्र प्रत्यक्षात कर्जदारांना एकाही रुपयाचा लाभ न देता बँक व्यवस्थापक व संस्थापकांनी संगनमताने ती रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून घेतल्याचे उघड झाले.कर्ज रक्कम मिळाली नाही, तरी २०२३ मध्ये अचानक सचिन गरुड यांच्या नावावर थकबाकीची नोटीस आली. त्यानंतर तहसील कार्यालयात चौकशी केल्यावर संपूर्ण घोटाळा उघड झाला.

याबाबत सचिन गरुड यांनी शिरूर न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने सुनावणीनंतर सदर प्रकरणी आरोपींवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिरूर पोलिसांनी माजी आमदार अशोक टेकवडे, दिलीप वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य टेकवडे, विजया टेकवडे, दिनेश घोणे, भूषण गायकवाड, सतीश जाधव, प्रदीप जगताप व गणेश जगताप (सर्व रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करीत आहेत. दरम्यान या कारवाईमुळे शेतकरी व कर्जदारांमध्ये संतापाचे वातावरण असून, सहकारी संस्थांवर विश्वासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago