क्राईम

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार तर एक जखमी…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर आज (गुरुवार) दुपारी १२ ते साडे बाराच्या दरम्यान चारचाकी व दुचाकीमध्येभीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ठार तर एक जण जखमी झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विनोद राजकरण यादव (वय ३२), लाला धरमपाल यादव (वय २५) अशी दोघा मृतांची नावे आहेत. लालमल चुक्कीमल यादव (सर्व रा. शिव ता. बभेरु जि.बांदा, उत्तर प्रदेश) हा एक जण गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस जमादार देवीदास खेडकर यांनी दिली.

टाकळी हाजी पोलीस खेडकर यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार, आज दुपारी साडेबाराच्या आसपास अष्टविनायक महामार्गावरून ३ जण दुचाकीवरून कवठे येमाई बाजूकडे चाललेले असताना ईचकेवाडी जवळ खार ओढ्याच्या वळणावर समोरून आलेल्या चार चाकी वाहन व दुचाकीची जोरात धडक झाली. या अपघातात २ जण ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे .घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमीला पुढील उपचारासाठी व ठार झालेल्या दोघांना पी. एम. साठी तात्काळ शिरूर येथे हलविण्यात आले आहे.

सुपर कॅरी गाडी नं Mh 14 के क्यू 4017 व हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटर सायकल नंबर MH 14 JQ 8931 यांचा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहने टाकळी हाजी दूर क्षेत्र या ठिकाणी लावण्यात आली आहेत, अशी माहिती खेडकर यांनी दिली.

दरम्यान, अष्टविनायनक महामार्ग वेगवान झाल्याने इचकेवाडी जवळील खार ओढ्या जवळच्या वळणावर येणारी जाणारी वाहने अतिशय वेगात जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. ओढ्याच्या दोन्ही बाजूस तात्काळ गतिरोधक करण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांतून व्यक्त होत आहे.

अष्टविनायक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा मृत्यू…

रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर युवकाचा मृत्यू…

अष्टविनायक महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

शिरूर! दिगांबर सायकल नसल्याने शाळेत पायी यायचा; उपचारादरम्यान मृत्यू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

16 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago