रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार

क्राईम मुख्य बातम्या

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर दोन महिला रस्त्याच्या कडेला उभ्या असताना चारचाकी गाडीची धडक बसल्याने एका बेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असुन याबाबत मेघा राजाराम फंड, (वय 40) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. या अपघातानंतर वाहनचालक महेश वसंत वाळके (रा. बाभुळसर खुर्द, ता.शिरुर, जि. पुणे) हा पळुन गेला आहे.

 

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 25 मार्च 2024 रोजी रात्री 8:30 च्या सुमारास बाभुळसर खुर्द गावच्या हददीत बाभुळसर ते रांजणगावकडे जाणाऱ्या डांबरी रोडच्या कडेला साईडपट्टीवर फिर्यादी मेघा फंड आणि त्यांची बहीण मिना रवी घेमुड (वय 42) रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे या दोघी उभ्या असताना महेश वसंत वाळके (रा. बाभुळसर खुर्द) याने त्याच्याकडील पांढ-या रंगाच्या चारचाकी महींद्रा एक्स यु व्ही क्रं एम एच 12 व्ही व्ही 7575 गाडीने मिना घेमुड यांना धडक देऊन अपघात केला आणि पळुन गेला.

 

सदर अपघातात मिना घेमुड यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याने वाहनचालक महेश वसंत वाळके याच्या विरुध्द रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करत आहेत.

शिरुर तालुक्यात महसूल आणि पोलिसांचा वसुलीचा चाललाय खेळ; त्यामुळे वाळू माफियांचा बसलाय मेळ

शिरुर; घोड धरणाची वाळू माफीयांनी लावलीये वाट; रात्रंदिवस वाळू उपशाचा घातलाय घाट