क्राईम

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान अक्षरशः गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेला. भरधाव वाहनाला धडक देऊन अडवण्यात आले आणि त्यानंतर झालेल्या थरारक गोळीबारात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल काळे (वय ३१, रा. बाबुराव नगर, शिरूर) याचा घटनास्थळी मृत्यू झाला असून केदार झाडगे (रा. कुंभार आळी, शिरूर) हा गंभीर जखमी झाला आहे. सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विशाल काळे आणि केदार झाडगे हे वाहनातून जात असताना आरोपींनी त्यांच्या गाडीला ठोकर देऊन अडवले. त्यानंतर सनी यादव (रा. बकोरी फाटा, वाघोली) व त्याच्या अन्य ५ ते ६ साथीदारांनी अचानक हल्ला चढवत गोळीबार केला. या हल्ल्यात विशाल काळे याला गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर केदार झाडगे गंभीर जखमी झाला. जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
प्राथमिक तपासात हा हल्ला पैशांच्या व्यवहारातील जुन्या वादातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृत आणि आरोपी हे दोघेही विविध गुन्ह्यांमध्ये नोंद असलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. करडे घाट परिसराला पोलिसांनी छावणीचे स्वरूप दिले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.
या थरारक हत्याकांडामुळे शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरदिवसा रस्त्यावर वाहन अडवून गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागील नेमके कारण, आरोपींची संख्या आणि वापरण्यात आलेल्या शस्त्रांबाबतचा तपशील पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, करडे घाटातील या रक्तरंजित गोळीबाराने शिरूर तालुका हादरला असून, पोलिसांसमोर आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…

Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…

कलाकेंद्रावरील कथित गोळीबार प्रकरण; गोळीबाराच्या घटनेचा राजकीय हेतूने गैरवापर, शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा निषेध

शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…

…अन्यथा शिरुर तालक्याचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

7 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

13 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

14 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

14 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

14 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

15 तास ago