महाराष्ट्र

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचे सुपुत्र पैलवान महेंद्र गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल आयोजित भव्य नागरी सत्कार व गौरवनिधी पुरस्कार सोहळ्यास ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी महेंद्र गायकवाड यांच्या जिद्द, कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि चिकाटीचे कौतुक केले. ग्रामीण भागातील युवकाने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘हिंदकेसरी’ किताब मिळवणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अशा यशामुळे राज्यातील युवा पिढीला प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

महेंद्र गायकवाड यांची कामगिरी ही केवळ वैयक्तिक यश नसून मंगळवेढा तालुका आणि सोलापूर जिल्ह्याचा गौरव असल्याचे सांगत गोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

या सत्कार सोहळ्यास आमदार समाधान आवताडे, ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, आवताडे शुगर फॅक्टरीचे चेअरमन संजय आवताडे, उद्योजक वैभव नागणे, उमेश परिचारक, नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, पंचायत समिती सभापती दिपाली ताड, नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे, उपनगराध्यक्ष येताळा भगत, उपसभापती अर्जुन मल्लाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेला नवी उंची देणाऱ्या या यशाचे सर्व स्तरांतून स्वागत आणि कौतुक करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

6 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

12 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

13 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

13 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

13 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

14 तास ago