क्राईम

शिरूर तालुक्यात गावठी पिस्टल बाळगून खुन, अपहरण, खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, काठापुर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परिसरात अवैध गावठी पिस्टल बाळगून खुन, खुनाचा प्रयत्न तसेच अपहरण करुन खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये वाळू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा समावेश आहे.

अंकुश महादेव पाबळे (वय 26), ज्ञानेश्वर उर्फ माऊली श्रीकांत पाबळे (वय 25 दोघे रा. कावळ पिंपरी ता. शिरुर), विशाल उर्फ आण्णा शिवाजी माकर (वय 23 रा. ढोकसांगवी ता. शिरुर), दिलीप रामा आटोळे (वय 45 रा. जांबुत दुडेवस्ती ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून पुणे ग्रामीण पोलिस दलातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिलीप आटोळे याचा वाळूचा व्यवसाय आहे.

आरोपींनी बांधकाम व्यावसायिक लियाकत नुरइस्लाम मंडल (वय 54 रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करुन बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर वाळू आमच्याकडून घ्यायची तसेच दहा लाख रुपयांची खंडणी मागीतली. त्यावेळी आरोपीने पिस्टल मंडल यांच्या डोक्याला लावले. घाबरलेल्या मंडल यांनी एक लाख रुपये देण्याचे कबुल केले. आरोपींनी मंडल यांच्या मुलाकडून एक लाख रुपये घेतल्यानंतर त्यांना सोडले. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2 सप्टेंबर रोजी घडला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्ह्यातील आरोपी भीमा कोरेगाव येथे येणार असून ते मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत काडतुसे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रोख रक्कम, लाकडी दांडके जप्त केले आहे.

संबंधित कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, एलसीबी पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलिस अंमलदार तुषार पंदारे, राजू मोमीण, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेस नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, हेमंत विरोळे, धिरज जाधव, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, शिरुर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, पोलिस अंमलदार जी.एन. देशमाने, नितीन सुद्रीक, बाळू भवर, एन. जगताप, व्ही. मोरे, एन. थोरात. ए. भालसिंग, आर. होळनोर, पी. देशमुख यांच्या पथकाने केली आहे. आरोपींना 21 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई; 8 गावठी पिस्टल जप्त; धाबे दणाणले…

रांजणगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पिस्टल घेणाऱ्यांचे दणाणले धाबे…

शिरूर तालुक्यातील बंधाऱयाचे ढापे चोरणाऱया टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश…

शिरूर तालुक्यात अंकाऊंट साफ करणारा पोलिसांच्या जाळयात…

शिरूर तालुक्यातील व्यक्तीने मोबाईल कंपनीला दिला दणका; मिळणार रक्कम…

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

5 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

11 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

12 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

12 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

12 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

13 तास ago