shirur lcb

शिरूर तालुक्यातील बंधाऱयाचे ढापे चोरणाऱया टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात नदीच्या बंधाऱ्याच्या लोखंडी ढापे किंमत 3,55,320 रुपयांचे चोरीस गेले होते. नदीच्या बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणा-या आठ जणांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

सदर प्रकारचे गुन्हे मागील काही दिवसांपासून पुणे ग्रामीण जिल्ह्यात वारंवार घडत असल्याने गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी स्था.गु.अ.शाखेच्या तपास पथकास दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत व ईतर तांत्रिक बाबी व गोपनीय बातमीदार यांचेकडे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा
1) विनोद उर्फ मल्ल्या चित्तानंद मरगुत्ती (रा. गव्हाणे वस्ती, हिंदी स्कुल जवळ, भोसरी, ता. हवेली, जि. पुणे)
2) महेश नागप्पा बिराजदार (रा. गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर, भोसरी, ता. हवेली, जि.पुणे) यांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने केला असल्याची बातमी तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्या अनुशंगाने त्या दोघांचे बारीक बारीक हालचालींवर लक्ष ठेवून उपयुक्त माहिती प्राप्त करून घेवून बातमीचे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर वरील दोघेही त्यांचे इतर साथीदारांसह लांडेवाडी चौक भोसरी परीसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

लांडेवाडी चौक भोसरी परीसरात पोलिस तपास पथकासह सापळा रचून थांबले असता विनोद मरगुत्ती व महेश बिराजदार असे त्यांचे इतर दोन मित्रांसह लांडेवाडी चौकात आल्यानंतर त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यांचे सोबतचे इतर दोघांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे
3) रोहन शंकर बिराजदार (वय 20 वर्षे, व्यवसाय हॉटेल वेटर, सध्या रा. गव्हाणे वस्ती, पालखी हॉटेलचे मागे, भोसरी ता. हवेली, जि.पुणे, मुळ रा. वाणी हंदराळ, पो. कुन्हाळी ता. उमरगा, जि. धाराशीव)
4) आदित्य उर्फ आण्णा उमाशंकर रायजे (वय 20 वर्षे, व्यवसाय नोकरी,सध्या रा. गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर, विलास लांडे यांचे खोलीत, भोसरी, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा. कोराळी, ग्रामपंचायत जवळ, ता. निलंगा, जि. लातूर) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा हा आणखी काही साथीदारांचे मदतीने केला असल्याचे सांगितले.

गुन्हा करते वेळी हुंदाई कंपनीची सिल्हवर रंगाची एक्सेंट कार नं. एम.एच 12 बी.वाय 8356 चा वापर केला असल्याचे सांगितले. इतर साथीदार हे लांडेवाडी ते भोसरी रोडवरील जायका बिर्याणी हॉटेल जवळ असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे चौघांना सोबत घेवून उर्वरीत संशयितांचा शोध घेतला असता ते जायका बिर्याणी हॉटेल जवळ उभे असताना त्यांना जागीच ताब्यात घेवून त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे
5) आकाश महादेव बिराजदार (वय 23 वर्षे, व्यवसाय नोकरी, सध्या रा. गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर, विलास लांडे यांचे खोलीत, भोसरी, ता. हवेली, जि.पुणे, मुळ रा. कोराळी, ग्रामपंचायत जवळ, ता. निलंगा, जि. लातूर)
6) प्रशांत विजय मळेकर उर्फ बिराजदार (वय 25 वर्षे, व्यवसाय रिक्षाचालक, सध्या रा. साईदीप सोसायटी शंकर शिंदे यांचे खोलीत, वैदवाडी, हडपसर, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा. कोराळी, ग्रामपंचायत जवळ, ता. निलंगा, जि. लातूर)
7) सुनील माधव जाधव (वय 19 वर्षे, व्यवसाय नोकरी, सध्या रा. गव्हाणे वस्ती, पालखी हॉटेलचे मागे, भोसरी ता. हवेली, जि.पुणे, मुळ रा. वाणी हंदराळ, पो. कुन्हाळी ता. उमरगा, जि. धाराशीव)
8) समीर लहू सरोदे (वय 28 वर्षे, व्यवसाय मोबाईल शॉपी,सध्या रा. अंकुश चैक, राजहंस सोसायटी बिल्डींग नं. 14, तिसरा मजला, फ्लॅट नं. 203, निगडी, पुणे, मुळ रा. बावडा ता. इंदापुर जि.पुणे) असे असल्याचे सांगितले.

सर्वांकडे चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. गुन्हा करणेसाठी महेश बिराजदार याने समिर सरोदे याचेकडील एक्सेंट कार नं. एम.एच12 बी.एल 8356 हि आणली होती. सदर कारचा वापर संशयित आरोपी यांनी गुन्हा करतेवेळी केला असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांचे सोबत गुन्हा करतेवेळी आरोपी
9) शुभम ज्योतीबा पटाळे (रा. दावणगाव, ता. उदगीर जि. लातूर)
10) अनिल उर्फ अनुराग शिवा बिराजदार (रा. कोराळी ता. निलंगा जि. लातूर) हे होते व ते सध्या पळून गेलेले आहेत असे सांगितले.
त्यांनी यापुर्वी देखील खालील तक्त्यात नमुद केले प्रमाणे गुन्हे केल्याचे सांगितलेने गुन्हयातील चोरी केलेल्या मालाबाबत विचारपूस करता, सदरचा चोरी केलेला माल हा विनोद उर्फ मल्ल्या मरगुत्ती व आदित्य उर्फ आण्णा उमाशंकर रायजे यांनी भंगार व्यावसायिक
11) फिरोज चांद शेख (रा. लांडेवाडी चैक, गव्हाणे वस्ती, भोसरी पुणे) यास सदरचा माल चोरीचा असल्याची जाणीव करून देवून विक्री केला असल्याचे सांगितले आहे. सदरचा आरोपी फिरोज शेख याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
वरील आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना पुढील कारवाईसाठी शिरूर पोलिस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींकडून शिरूरसह खेड, मंचर, पौड या ठिकाणी अशाच प्रकारे नऊ केलेले गुन्हे उघडकीस आणले आहेत.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पो.उप.निरिक्षक गणेश जगदाळे, स.फौ तुषार पंदारे, पो.हवा दिपक साबळे, पो.हवा. जनार्दन शेळके, विक्रम तापकीर, राजू मोमीन, पो.ना मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, पो.काँ अक्षय नवले, निलेश सुपेकर, चा.स.फौ काशिनाथ राजापुरे यांनी केली आहे.