क्राईम

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत भावाच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकत त्याच्या कुटुंबावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना निमगाव दुडे (ता. शिरूर) येथे घडली आहे. या भीषण हल्ल्यात शेतकरी, त्यांची पत्नी आणि वृद्ध वडील गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ज्ञानेश्वर संपत गायकवाड (वय ४० (रा. निमगाव दुडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरुन चुलत भाऊ नितीन बाळासाहेब गायकवाड, चुलती मालती बाळासाहेब गायकवाड, राहुल घोडे आणि शिवाजी घोडे (सर्व रा. निमगाव दुडे, शिरूर) यांच्याविरुद शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर गायकवाड यांनी महिनाभरापुर्वी गावातील सोनवणे यांच्याकडून २५ गुंठे शेतजमीन खरेदी केली आहे. ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर, त्यांची पत्नी स्वाती आणि वडील संपत हे या नवीन शेतात काम करत असताना त्यांचा चुलत भाऊ नितीन गायकवाड तिथे आला. त्याने “तुम्ही माझ्या आईला मारहाण का केली…?” असा खोटा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली.

यावेळी गायकवाड कुटुंबाने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र नितीनने अचानक खिशातील मिरचीची पुड काढून ज्ञानेश्वर यांच्या डोळ्यात फेकली आणि शर्टाच्या पाठीमागे लपवून आणलेल्या लाकडी दांडक्याने ज्ञानेश्वर यांच्या डोक्यात, पाठीत, खांद्यावर आणि हातावर बेदम मारहाण सुरू केली. तसेच मध्यस्थी करणाऱ्या त्यांच्या पत्नी व वडिलांनाही दांडक्याने मारहाण करुन गंभीर दुखापत केली.

हा हल्ला करत असतानाच आरोपीने, “पुन्हा माझ्या नादी लागला, तर गावातील राहुल घोडे, शिवाजी घोडे आणि अजिंक्य गायकवाड यांना आणुन तुझा कार्यक्रम (खून) करतो,” अशी धमकी दिली. आरडाओरडा ऐकून शेजारील शेतातील लोक धावून आले आणि त्यांनी जखमींची सुटका केली. दरम्यान, तिथे आलेल्या नितीनची आई मालती गायकवाड हिनेही “तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये पाठवीन,” अशी धमकी दिली.

यानंतर जखमी कुटुंब शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार गेले. तिथे पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. यावेळी जखमी गायकवाड कुटुंब ग्रामीण रुग्णालयाबाहेर जात असताना आरोपी राहुल घोडे आणि शिवाजी घोडे यांनी पुन्हा त्यांचा रस्ता अडवून “नीट राहा, नाहीतर तुझा कार्यक्रम करण्यात येईल,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी ज्ञानेश्वर गायकवाड आणि त्यांची पत्नी यांना शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास शिरूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सोनबा चव्हाण हे करत आहेत.

शिरूर! वरूडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दातच पाडले…

शिरूरमध्ये ‘सोन्याच्या मोडी’च्या नावाखाली तब्बल १ कोटींची फसवणूक…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago