शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायवर दहशतवादी विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन यांनी मंगळवारी (ता. २) दुपारी चारच्या सुमारास संयुक्त छापा टाकून कारवाई केली आहे. सदरची कारवाई हि भुषण माने पोलिस उपअधिक्षक, पोलिस मुख्यालय, पुणे ग्रामीण यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे करण्यात आलेली आहे.
सदर कारवाईमध्ये आरोपी १) लुतफ्फर मुज्जमलहक शेख वय ४५ वर्षे, मुळ रा. नालीताजल, ता. बाजीतपुर, थाना-धनियाखाली, जि.हुगली, पश्चिम बंगाल, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे, २) बबलु साहु सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे मुळ रा. उडीसा यांचे विरुध्द स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी हे महिलांच्या असहाय्यतेच्या फायदा घेवुन त्यांना लैंगीक हेतुकरीता अवैध्दरित्या संगणमताने देहविक्री करीत असताना मिळून आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी लुतफ्फर शेख याला गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आलेली असुन आरोपी बबलु साहु हा फरार आहे. त्याचेविरुध्द यापुर्वी देखील अशा प्रकारे वेश्याव्यवसाय चालविले प्रकरणी रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
View this post on Instagram
सदर छापा कारवाईमध्ये एकुण ७ महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. सुटका केलेल्या महिलांपैकी ३ महिला या बांग्लादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर पीडित महिलांना महिला सुधारगृह येथे सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात आलेले आहे. सदर पीडित बांग्लादेशी महिलांना कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यावर परत बांग्लादेशामध्ये पाठविण्याची कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.
View this post on Instagram
सदरची कारवाई हि पोलिस अधिक्षक संदीप गिल्ल, प्रशांत ढोले उपविभागीय पो. अधिकारी शिरुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली भुषण माने, पोलिस उपअधिक्षक, पोलिस मुख्यालय, पुणे ग्रा. यांचे नेतृत्वामध्ये दहशतवाद विरोधी शाखेचे पोलिस अंमलदार सहा. उपनिरीक्षक महेश गायकवाड, सहा.उपनिरीक्षक विशाल गव्हाणे, पो.काँ. औंकार शिंदे, पो.काँ. मोसीन शेख, पो.हवा. गणेश चंदनशिव पोकॉ अक्षय आदक तसेच रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे अविनाश थोरात, पोलिस उपनिरीक्षक, पो.हवा. संतोष औटी, पो.हवा. विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, विजय सरजिने, संदिप जगदाळे, पो.कॉ. संतोष साळुंखे, अमोल रासकर, किशोर शिवणकर, योगेश गुंड, म.पो.हवा. विद्या बनकर, म.पो.कॉ. मोहीनी पाटील, म.पो.कॉ. शुभांगी लबडे, सोनाली जगताप यांचे दोन वेगवेगळे पथके तयार करुन करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास महादेव वाघमोडे पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, रांजणगाव MIDC पो.स्टे. हे करीत आहेत.
DYSP ऑफिस जवळच हाकेच्या अंतरावर चाललाय वेश्या व्यवसाय ; प्रशासनाचे दुर्लक्ष…?
शिक्रापूरमध्ये पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर वेश्याव्यवसाय; ५ ताब्यात…
शिरुरमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई; तीन जणांवर गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसाय करणा-या तिघांविरुध्द गुन्हा दाखल; पोलिसांनी केली एका महिलेची सुटका