prostitute
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर एका खासगी बिल्डींगमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये तीन जणांसह दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
दोन महिलांसह वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या राधे श्याम वाळूज (रा. पारनेर, जि. अहमदनगर), बाळासाहेब फक्कडराव पोतले (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर) व संकेत सुभाष शितोळे (रा. न्हावी सांडस ता. हवेली जि. पुणे) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर तानाजी साळुंखे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पाबळ चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया समोर बाळासाहेब पोतले यांच्या बिल्डींगमध्ये काही व्यक्ती व महिला वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, पोलिस हवालदार विकास पाटील, उद्धव भालेराव, महिला पोलिस शिपाई उर्मिला पवार, शीतल गवळी यांनी सदर ठिकाणी जाऊन बनावट ग्राहक बिल्डींगमध्ये पाठवून तपासणी करत छापा टाकला. यावेळी एक जण इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारून पळून गेला. मात्र, पोलिसांनी दोघांसह दोन महिलांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे हे करत आहेत.
शिरूर पोलिसांकडून रोडरोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई…
शिरूर तालुक्यात पेट्रोल पंपाचे पैसे घेऊन कामगार झाला फरार…
शिरूर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात मित्रानेच मित्राला घातला लाखो रुपयांचा गंडा…
शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…