शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील एका अल्पवयीन मुलीला शाळेत जात असताना छेडछाड करणारा आरोपी शिरुर पोलिसांनी गजाआड केला आहे. त्याचे पुर्ण नाव व पत्ता माहीत नसतानाही पोलिसांनी जलदरीत्या तपास करून त्याला पारनेर तालुक्यातून गजाआड केले आहे. वैभव राजेंद्र शेळके (वय २१) असे त्याचे नाव असुन तो वाडेगव्हाण ता. पारनेर, जि. अहमदनगर येथील रहीवाशी आहे.
फेब्रुवारी २०२४ ते मार्च २०२४ या दरम्यान कवठे येमाई (ता.शिरुर) या गावच्या हद्दीत चंदननगर ते न्यु इंग्लिश स्कुल या दरम्यान वैभव शेळके याने एक अल्पवयीन मुलगी ही शाळेला जात असताना तिचा त्याने दुचाकी वरुन पाठलाग करत तिच्याकडे एकटक पाहुन हसुन तिला डोळा मारुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याचे पुर्ण नाव व पत्ता माहीत नसल्यामुळे तपासात अडथळा येत होता. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार व सहकाऱ्यांनी अथक तपास करत त्याला गजाआड केले आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले
शिरुर तालुका कुस्ती स्पर्धेत मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम शाळेचे निर्विवाद वर्चस्व
शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल