dead

शिरूर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…

क्राईम

पाबळ (सुनिल जिते) : केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड वस्ती येथील चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिसांत आकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. साक्षी विशाल साकोरे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील साक्षी साकोरे या महिलेचा चार महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास साक्षीने घरात गळफास घेतल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती विवाहितेच्या आई वडिलांना कळताच त्यांनी घटनास्थळी येत नातेवाईकांच्या मदतीने साक्षीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, साक्षी विशाल साकोरे (वय २२, रा. पाचवड वस्ती केंदूर ता. शिरुर जि. पुणे) या नवविवाहितेचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याबाबत विवाहितेची आई मालती बाळासाहेब दौंडकर (वय ४२, रा. कन्हेरसर ता. खेड जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार संतोष शेळके हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात मित्रानेच मित्राला घातला लाखो रुपयांचा गंडा…

शिरूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर आढळला मृतदेह…

शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात चुलती व पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ