dead
सविंदणे (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील भाऊसाहेब बाळू शिंदे (वय ४५) या युवकाचा मृतदेह दहा दिवसापुर्वी मलठण-थोरातवाडी या रस्त्यावर आढळून आला होता. सदर व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीच्या डोक्यात बऱ्याच ठिकाणी जखमा आढळून आल्या होत्या. शिरूर पोलिसांनी पंचनामा केला असून ते पुढील घटनेचा तपास करत आहे.
संबंधित युवकाचा अपघात झाला नसून घातपात झाला असल्याचा संशय शिंदेवाडी ग्रामस्थ व्यक्त करत असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करण्याची आग्रही मागणी सरपंच सिमाताई कोळपे, ग्रा.सदस्य किरण शिंदे, लक्ष्मण शिंदे, यांनी केली आहे.
भाऊसाहेब यांच्या डोक्यात चार ते पाच ठिकाणी वार असून कानही तुटला आहे. तसेच उजवा हात व पाय फॅक्चर आहे. त्यामुळे शंभर टक्के घातपात झाला असून शिरूर पोलिस आमचा तपास चालू आहे, असे सांगून टाळाटाळ करत आहेत. तसेच तपासाकडे जाणीवपुर्वक टाळाटाळ करत असून, अपघात झाल्याचे भासवत असल्याचे भाऊसाहेब यांचा पुतण्या लक्ष्मण शिंदे यांनी सांगितले आहे.
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…