श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांस अटक करण्यास श्रीगोंदा पोलिसांना यश आले असुन ज्ञानेश्वर काढण्या भोसले तसेच अविनाश उर्फ पिंट्या काढण्या भोसले (रा. कोळगाव, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर अशी केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत श्रीगोंदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑगस्ट रोजी भानगाव येथील खंडू सखाराम बाबर यांच्या राहत्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरामध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि घरासमोर लावलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू असताना श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना खबऱ्या मार्फत खात्रीलायक माहीती मिळाली की सदरचा गुन्हा कोळगाव येथील सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर काढण्या भोसले, तसेच अविनाश उर्फ पिंट्या काढण्या भोसले यांनी केला आहे. त्या माहितीनुसार रामराव ढिकले. पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बो-हाडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे (दि.१७) ऑगस्ट रोजी गुन्हेगारी वस्त्यांवर कॉंबिंग ऑपरेशन केले असता ज्ञानेश्वर काढण्या भोसले, अविनाश उर्फ पिंट्या काढण्या भोसले हे दोन संशयित आरोपी मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी भानगांव येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जे.शेखर पाटील, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बो-हाडे, सहायक फौजदार अंकुश ढवळे (SDPO) पोलिस नाईक गोकुळ इंगवले, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर, रविंद्र जाधव यांनी केली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा नवा…
मुंबई : जमिनीवर प्रत्यक्ष वहिवाट आणि ताबा असतानाही सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या राज्यातील…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षफुटी, पक्षांतर आणि सत्तेच्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीचे…
मिरा-भाईंदर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेला धक्का देत माजी…
मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला…
बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार बजरंग…