इतर

UPI युजर्सना मोठा झटका: पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी आता लागणार चार्ज

मुंबई: तुम्हीही अनेकदा UPI द्वारे पैसे भरत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया UPI आधारित निधी हस्तांतरणावर शुल्क आकारु शकते. यामुळे भविष्यात UPI मधून पैसे ट्रान्सफर करणे महागात पडू शकते. RBI कडून पेमेंट ट्रान्सफरचा खर्च काढून टाकण्याचा विचार केला जात आहे.

शुल्क आकारणीसाठी लोकांकडून सल्ला
शुल्क आकारणीसाठी लोकांकडून सल्ला घेण्यात येत आहे. यासाठी RBI कडून ‘डिस्कशन पेपर ऑन चार्जेस इन पेमेंट सिस्टम’ जारी करण्यात आला आहे. RBI ने शुल्क आकारण्याबाबत लोकांकडून सल्लाही मागितला आहे. मध्यवर्ती बँकेच्या वतीने या पेपरमध्ये असे म्हटले आहे की, ऑपरेटर म्हणून रिझर्व्ह बँकेला RTGS मध्ये मोठ्या गुंतवणुकीची आणि ऑपरेटिंग खर्चाची भरपाई करावी लागेल.

UPI वर होणारा खर्च घेणार
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार त्यात जनतेचा पैसा गुंतवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, त्याची किंमत काढून टाकणे आवश्यक आहे. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटमध्ये आकारले जाणारे शुल्क म्हणजे RTGS हे कमाईचे साधन नाही, असेही RBI ने स्पष्ट केले. परंतु भविष्यात ही सुविधा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु राहावी यासाठी UPI वर खर्च केला जाईल.

रिअल टाइम फंड ट्रान्सफरची सुविधा
UPI पेमेंट ट्रान्सफरसाठी रिअल टाइम ट्रान्सफरची सुविधा देते. त्याचप्रमाणे, ते रिअल टाइम सेटलमेंट देखील निश्चित करते. ही संपूर्ण यंत्रणा तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्याची आणि निधी हस्तांतरण कोणत्याही जोखमीशिवाय चालवण्याची गरज आहे. त्यासाठी खर्चही खूप होतो. मोफत सेवेच्या स्थितीत महागड्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आणि बनवण्याचा मोठा खर्च कोण उचलणार, असा सवालही RBI ने केला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या या प्रश्‍नांवरुन हे स्पष्ट झाले आहे की, आगामी काळात UPIमधून निधी हस्तांतरित करणे महागडे ठरु शकते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago