traffic police
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात तसेच ग्रामीण भागामध्ये विविध चौकात रस्त्यांवर व इतर ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांना ऑनलाईन स्वरुपात पोलिसांकडून ई-चलान पाठविले जाते. तरी देखील वाहन चालक ई-चलानकडे दुर्लक्ष करून राजरोसपणे मोटर वाहन कायदयांतील नियमांचे उल्लंघन करत असताना दिसून येत आहेत.
निलेश बाळू जासूद (रा. चव्हाणवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) हा त्याच्याकडील स्विफ्ट कार नं. एम.एच. १२ एस.एन. ९८६० हीस ब्लॅक फिल्मींग करून शिरूर शहरामध्ये शनिवारी (ता. ३०) आला होता. सी. टी. बोरा कॉलेज, शिरूर येथे वाहतुक पोलिस सहा. फौज. चव्हाण व मपोना जाधव यांनी त्यास थांबवले. मोटारीच्या काचांना ब्लॅक फिल्मींग केली असल्याने सदर वाहनावर १,५०० रुपये रक्कमेचे ई-चलान पाठविले. त्यावेळी असे निदर्शनास आले की, सदर वाहनावर ठाणे, रायगड, शिरूर तालुका, पुणे शहर, पिंपरी चिंचवड या परिसरात वाहनाचे काचास ब्लॅक फिल्मींग करणे, वाहन नो पार्किंगमध्ये उभा करणे, वाहतूक पोलिसांचा इशारा न मानने वगैरे स्वरूपाचे मोटर वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याने १९/०२/२०२१ रोजीपासून ते आजपर्यंत एकूण २४,००० रुपयांचा रक्कमेचा दंड थकीत आहे.
ब्लॅक फिल्मींग मुळे सदर वाहनावर दंडात्मक कारवाई होवून देखील वाहन धारक कायद्यास न जुमानता पुन्हा सदर वाहनाचे काचास ब्लॅक फिल्मींग करून वाहन शहरामध्ये फिरवित असल्याचे दिसुन आले. त्यामुळे त्याच्याकडुन थकीत एकूण २४,००० रुपये दंडाची रक्कम ताबडतोप वसुली करून सरकारी तिजोरीत जमा करण्यात आलेली आहे.
शिरूर शहर व ग्रामीण परिसरातील नागरिकांना शिरूर पोलिसांकडून जाहिर आवाहन देण्यात येते की, आपण कोठेही वाहन चालवित असताना वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर आपणांवर ई चालानद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते व तो दंड अशा प्रकारे एक ना एक दिवस आपलेकडून वसुल करण्यात येतोच त्यामुळे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये व सुरक्षित प्रवास करावा.
वरीलप्रमाणे कार्यवाही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मितेश घटटे, पुणे व उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, शिरूर यांचे मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहा, फौज. अनिल चव्हाण, मपोना बी. के. जाधव या टिमने केली आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…