क्राईम

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक; कशी पाहा…

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला उसतोड कामासाठी कामगार पुरवितो असे म्हणून शेतकऱ्याची तब्बल सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सोमनाथ शेम्पू सोनवणे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील विश्वनाथ गवारे यांचा शेतीसह उसाचा व्यापार आहे. गवारे यांना नेहमी उसतोडणी साठी कामगार लागत असल्याने ते विविध ठिकाणहून कामगार आणत असतात. गवारे यांची व्यवसायातून सोमनाथ सोनवणे याच्या सोबत ओळख झालेली होती. सोनवणे याने गवारे यांना उसतोड कामगार आणून देतो त्यांना देण्यासाठी उचल द्यावी लागेल, असे म्हणून तब्बल सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये घेतले. त्यांनतर आज कामगार येतील, उद्या कामगार येतील असे म्हणत कामगार पुरविण्यास टाळाटाळ केली.

सोनवणे याने कामगार पुरविले नाही तसेच गवारे यांचे पैसे देण्यात देखील टाळाटाळ करु लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने विश्वनाथ कोंडीबा गवारे (वय ६० वर्षे रा. विठ्ठलवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी सोमनाथ शेम्पू सोनवणे (रा. कौळाणे ता. मालेगाव जि. नाशिक) याच्या विरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार किशोर तेलंग हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

4 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

4 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

10 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

10 तास ago