सविंदणे: यवतमाळ जिल्हामधील पुसद तालुक्यामधील कारला गावामधील होलार समाजाचे प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये अडथळा आणुन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गावचे सरपंच रमेश राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करुनही अद्याप सदर आरोपीला अटक झालेली नाही. तरीही या संदर्भात (दि. ३०) जुलै २०२२ रोजी शिरुर शहर होलार समाजाच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सदर आरोपीला लवकरात लवकर अटक करुन कठोर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य शिरुर शहर होलार समाजाच्या वत्तीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अमोल करडे, चेतन माने, रविंद्र गुळादे, ऋतिक ढोबळे, सनी भोसले, शैलेश जाधव, युवराज गुळादे, कृष्णा करडे, जय जाधव, सचिन करडे, सोमनाथ करडे, बाळासो करडे, ऋतिक जाधव, समाधान कोठावळे, तेजस माने, संतोष माने उपस्थित होते. यावेळी रविंद्र गुळादे यांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करुन कठोर कारवाई न केल्यास समस्त शिरुर शहर होलार समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५…
शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या…
मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…
गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…