क्राईम

धक्कादायक! दोघांच्या भांडणात 8 वर्षाच्या मुलीला लागली गोळी अन…

धायरी: नवरा बायकोच्या भांडणात स्वतःच्या 8 वर्षीय मुलीला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पांडुरंग तुकाराम उभे (वय ३८ वर्षे, रा. हेरंब हाईट्स, नऱ्हे, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग उभे हे कुटुंबासह नऱ्हे येथील जेएसपीएम कॉलेज जवळ असणाऱ्या परिसरात राहतात. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तसेच त्यांच्याकडे परवाना असलेले रिवाल्वर आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते दारू पिऊन घरी आले. त्यामुळे दोघा नवरा – बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात त्यांनी बायकोवर रिवाल्वर उगारली. मात्र ती गोळी त्यांच्या 8 वर्षीय मुलीला छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

मुलीचा जीव वाचविण्यासाठी पोलिसांची धडपड…

गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पांडुरंग उभे यांना ताब्यात घेतले. तसेच ज्या खासगी रुग्णालयात जखमी राजनंदिनीवर उपचार चालू आहेत. त्या ठिकाणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी जाऊन जखमी राजनंदिनी चौकशी केली. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

21 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago