मुख्य बातम्या

रांजणगाव एमआयडीसीत DYSP यांच्या ऑफिस समोरुनच बेकायदेशीर मुरूम वाहतूक…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC त मोठया प्रमाणात बेकायदेशीर मुरुमाची चोरी आणि वाहतुक होत असुन शिरुरच्या महसूल विभागाचे याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मुरुमचोर मुजोर झाले असुन त्यांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे रांजणगाव MIDC त असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) कार्यालया समोरुनच बेकायदेशीर मुरुमाची वाहतुक करणाऱ्या गाड्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या मुजोर मुरुमचोरांना पोलिसांचा धाक उरलाय का नाही…? असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत आहेत.

रांजणगाव MIDC त अनेक ठिकाणी मोकळे प्लॉट असुन रात्रीच्या वेळेस या प्लॉटमधील मुरुमाची मोठया प्रमाणात चोरी करण्यात येते. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून कोणतीही रॉयल्टी न देता ही मुरुमचोरी होत असताना आणि अनेकवेळा स्थानिक नागरिकांनी पुरावे दिलेले असतानाही शिरुर तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावर कोणतीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे महसूलच्या अधिकाऱ्यांचे या मुरुम माफियांशी काही “साट-लोट” तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. तसेच नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांना काही जागरूक नागरिकांनी वेळोवेळी या बेकायदेशीर मुरुम वाहतुक करणाऱ्या गाड्यांचे व्हिडिओ आणि फोटो देऊनही ‘कारवाई केली जाईल’ या आश्वासना पलीकडे कोणतीच कारवाई झालेली नाही.

रांजणगाव MIDC ट्राफिक पोलिसांच होतंय दुर्लक्ष…?
रांजणगाव MIDC त बेकायदेशीर मुरुम घेऊन येणाऱ्या गाड्या या अनेकवेळा करडे, बाभूळसर या मार्गे कारेगावातुन पुणे-नगर हायवे वरुन यश इन चौकातून MIDC त जात असतात. या गाड्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मुरुम भरलेला असतो. या अवजड मुरुमाच्या गाड्यांच्या जवळून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी भविष्यात मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारेगाव येथील यश इन चौक आणि रांजणगाव येथील राजमुद्रा चौकातून औद्योगिक वसाहतीत प्रवेश करायला रस्ता आहे. या दोन्हीही मुख्य चौकातुनच ही अवजड वाहने MIDC त जात असतात.सर्वसामान्य लोकांना दिसणारी ही वाहने त्यामुळे ट्राफिक पोलिसांना दिसत नाहीत का…? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याबाबत शिरुरचे प्रभारी तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता. ते म्हणाले, शासनाचा महसूल बुडवून गौण खनिजाची चोरी करुन बेकायदेशीररीत्या कंपनीला मुरुम विकणाऱ्या लोकांचे नाव आणि लोकेशन आम्हाला कळविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

रांजणगाव MIDC त बेकायदेशीर मुरुम वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनावर कारवाई करण्यासंदर्भात ट्राफिक पोलिसांना आदेश देण्यात आले असुन अशा अवजड वाहतुक करणाऱ्या गाड्यांना दंड ठोठावन्यात येईल.
यशवंत गवारी
(उपविभागीय पोलिस अधिकारी,शिरुर)

यापुर्वी रांजणगाव MIDC अनेकवेळा अवजड वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत लाखोंचा दंड वसुल करण्यात आलेला आहे. यापुढेही अशा बेकायदेशीर मुरुम वाहतुक करणाऱ्या वाहनावर कठोर कारवाई करण्याच्या सुचना ट्राफिक पोलिसांना दिल्या आहेत.
बलवंत मांडगे, पोलिस निरीक्षक
(रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

13 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago