पुणे: मातृत्वाच्या नात्याला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दारूचे पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलाने झोपेत असलेल्या आईवर चाकूने वार केले. या हल्ल्या तिला गंभीर जखमी केले. सुदैवाने, प्रसंगावधान राखत भावाने आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचला. मात्र, तिची प्रकृती अद्याप अतिशय गंभीर आहे.
दारुसाठी पैसे न दिल्याचा राग, आईवर मुलाचा हल्ला
आरोपीचे नाव कृष्णा पप्पू कांबळे (वय ३०), सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड, पुणे असे असून पीडित महिलेचे नाव कौशल्य पप्पू कांबळे आहे. या प्रकरणी पीडितेचा मुलगा आणि आरोपीचा भाऊ बाबासाहेब पप्पू कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा कांबळे, आई कौशल्य कांबळे, भाऊ बाबासाहेब आणि वहिनी सोबत राहतो. आरोपीला दारूचे आणि इतर व्यसनाचे प्रचंड व्यसन असून, तो कोणतेही काम करत नाही. त्यामुळे तो नेहमी आईकडेच पैसे मागत असे आणि पैसे न दिल्यास वाद घालत असे.
घटनेच्या दिवशी रात्री उशिरा कृष्णाने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. आईने नकार दिल्याने त्याने मनात राग धरला. रात्री सर्व जण झोपेत असताना, तो स्वयंपाकघरातून चाकू घेऊन आला आणि आईच्या छातीवर चाकूने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने घरात आरडाओरडा झाला. भाऊ बाबासाहेब जागे झाले, पण तोपर्यंत आरोपी घरातून पळून गेला होता. भावाने तात्काळ आईला रुग्णालयात दाखल केले. सध्या ती अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी, हत्या, मारामारी, दराडे यासारख्या अनेक घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असाच प्रश्न निर्माण होतो आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…