महाराष्ट्र

हिंजवडीतील आयटी पार्कमधील त्या कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद

पुणे: हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या एका माहिती तंत्रज्ञान (आयटी) सल्लागार कंपनीने जवळपास ४०० नवीन उमेदवारांना सशुल्क प्रशिक्षण आणि हमखास नोकरी देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे हे आयटी कर्मचारी आता रस्त्यावर आले आहेत.

संबंधित कंपनीने आयटी क्षेत्रातील नवीन उमेदवारांना दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी १ ते ३ लाख रुपये शुल्क आकारले. प्रशिक्षणानंतर पुढील दोन महिन्यांसाठी १५ हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रोजेक्ट अलोकेशनसह ३ ते ४ लाख रुपये वार्षिक पगार निश्चित असल्याचे सांगण्यात आले.

या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण व दोन महिन्यांचा मानधन तर मिळाले, मात्र त्यानंतरच्या चार महिन्यांपासून पगार मिळालाच नाही. यावेळी अनेक जण कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करीत होते, तरीही वेतन देण्यात आले नाही. शिवाय, कंपनीचे कार्यालयही बहुतेक वेळा बंद असते. काही कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाकडे चौकशी केली असता, कंपनीकडून उलट पोलिसांना बोलावण्यात आले, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आयटी फोरमची मदत

या प्रकरणी पीडित कर्मचाऱ्यांनी फोरम फॉर आयटी एम्पलॉइज (एफआयटीई) या संघटनेकडे धाव घेतली आहे. संघटनेने हा मुद्दा आता कामगार आयुक्तांकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे. फोरमने ही घटना गंभीर फसवणूक असल्याचे म्हटले आहे. हा केवळ कामगार वाद नसून फौजदारी गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे.

फोरमची नवीन उमेदवारांना सूचना

पेड प्लेसमेंटच्या जाळ्यात अडकू नका

मोठी रक्कम भरण्यापूर्वी कंपनीचा इतिहास, रिव्ह्यू आणि आर्थिक स्थिती तपासा

पगार न देता कंपनी बंद करणे हा कामगार वाद नसून थेट फसवणुकीचा गुन्हा आहे.

या घटनेमुळे आयटी क्षेत्रात नोकरीसाठी धडपडणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीकडे सरकार आणि कामगार यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भूमिका फोरमने मांडली आहे.

दरम्यान आयटी क्षेत्रात रोजगार कपातीचे वारे सुरू आहे. अनेक बड्या कंपन्यांनी मनुष्यबळ कपातीचे धोरण स्वीकारले आहे. यामागे आयटी क्षेत्रातील मंदीचे कारण आहे. देशातील आघाडीच्या टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीने नुकतीच १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. यामुळे आयटीतील रोजगारांचा मुद्दा चर्चेत आला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

6 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

6 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

7 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

12 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

12 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

12 तास ago