पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी
पालघर: पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीवर विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४ नोंदवण्यात आला आहे. सदर आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे.आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला दुकानामध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केले.
रविवार (दि. २९ डिसेंबर) २०२४ रोजी ही मुलगी दुकानात गेली असता आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे केले, त्यामुळे घडलेला प्रकार मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला. यानंतर पालकांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला . ‘आरोपीचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासवणारे आहे, अशा नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी’, असे निर्देश या प्रकरणाबाबत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी श्री.बाळासाहेब पाटील , पालघर पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.
सदर घटनेचा तपास लवकरात लवकर करुन संबंधित मुलीला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात यावा असं म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही यावेळी दिलेल्या आहेत.
घटनेचा तपास अधिक जलदगतीने करावा व आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी. आरोपीला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर जामीनास कसून विरोध करण्यात यावा. पीडित मुलीचे समुपदेशन व शालेय शिक्षण चालू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…