क्राईम

बैलगाडा शर्यत बघण्यासाठी गेलेल्या युवकाची दुचाकी चोरीला…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी मल्हारी महादु लबडे हे (दि.२७) रोजी काठापूर खुर्द (ता. शिरुर) येथे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांची होन्डा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक एम.एच.१४ एफ.एफ ४११५ हि दुचाकी चोरुन नेली. याबाबत लबडे यांनी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मल्हारी लबडे हे आपला मुलगा मंगेश याच्यासह जारकरवाडी येथुन काठापुर खुर्द येथे यात्रा असल्याने बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले असता त्यांनी आपली दुचाकी हॅन्डल लॉक करून बैलगाडा घाटाशेजारी लावली होती. सायंकाळी सहाचे सुमारास शर्यती बघुन झाल्यानंतर आपल्या दुचाकीकडे गेले.

सदर मोटारसायकल दुपारी पार्क केलेल्या जागेवर त्यांना दिसली नाही. म्हणुन सदर दुचाकीचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता कोठेही आढळून न आल्याने दुचाकी चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे दुचाकी चोरीची फिर्याद दखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार अमोल आगलावे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

3 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago