क्राईम

महिला व मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न : अकोला आणि मध्यप्रदेशातील धक्कादायक घटनांनी समाज हादरला

अकोला: महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अकोला आणि मध्यप्रदेशातील दोन वेगवेगळ्या, मात्र तितक्याच धक्कादायक घटनांनी संपूर्ण समाज हादरून गेला आहे. विश्वासाचा गैरवापर, ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि सुरक्षेतील हलगर्जीपणा यामुळे निष्पाप महिला व मुलींना किती मोठी किंमत मोजावी लागते, हे या घटनांतून स्पष्ट झाले आहे.

अकोल्यात महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार, धर्मांतराचा दबाव

अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलेला ब्लॅकमेल करून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेने अकोला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

तक्रारीनुसार, पीडित महिला नियमितपणे संबंधित दुकानातून साहित्य खरेदी करत होती. ओळख वाढल्यानंतर आरोपी दुकानदाराने मोबाईल नंबर घेतला आणि पुढे विश्वासाचा गैरफायदा घेत नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा अश्लील व्हिडिओ असल्याचे सांगत आरोपीच्या दोन मित्रांनी महिलेचे ब्लॅकमेलिंग सुरू केले. बदनामी टाळण्यासाठी महिलेने तब्बल पाच लाख रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

इतकेच नव्हे तर व्हिडिओ डिलीट करण्याच्या अटीवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे. उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे अकोला शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मध्यप्रदेशात १२ वर्षीय मुलीवर दोन महिने अत्याचार, गर्भधारणा उघड

दरम्यान, मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील खुरई येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात घडलेली घटना अधिकच हादरवणारी आहे. शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर भाजीपाला पुरवठ्याच्या बहाण्याने येणाऱ्या एका तरुणाने दोन महिने सतत अत्याचार केला. धमकावल्यामुळे भीतीपोटी मुलगी गप्प राहिली.

अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे उघड झाल्यानंतर प्रकरण उजेडात आले. पोलिसांनी चौकशी करून अल्ताफ नावाच्या आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जागरूकतेची गरज अधोरेखित

या दोन्ही घटना वेगवेगळ्या राज्यांतील असल्या तरी त्यामागील वास्तव समान आहे. योग्य वेळी सावधानता न बाळगणे, अंधविश्वास आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी यामुळे असे गंभीर गुन्हे घडत आहेत. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी केवळ कायदे पुरेसे नसून घराघरात, शाळा, आश्रम, वसतिगृह आणि सार्वजनिक ठिकाणी व्यापक जागरूकता आवश्यक असल्याचे या घटनांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

22 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

22 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

2 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

2 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

2 दिवस ago