Crime
शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका पान टपरीतून चक्क १ लाख ७० हजार रुपयांचा गायछाप, सिगारेट सह आदी प्रकारचा माल चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथे बलेंदर यादव यांची ओंकार पान शॉप नावाने पानटपरी असून (दि. २३) जुलै रोजी रात्रीच्या सुमारास यादव त्यांची पानटपरी बंद करुन घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास यादव हे त्यांची पान टपरी उघडण्यासाठी आले असता त्यांना टपरीचे कुलूप तुटले असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी आतमध्ये जात पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने टपरीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करुन टपरीरील गायछाप तंबाकू, सिगारेट यांसह आदी साहित्य असा सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत बलेंदर राजकिशोर यादव (वय ३२) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…