शिरूर तालुका

कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही: रमेश गडदे

माझ्यामागे ग्रामस्थ व बाराबलुतेदार समाज असल्याचा गडदेंचा दावा

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे यांच्यावर सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असून त्याबाबतचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले असताना माझ्या मागे संपूर्ण ग्रामस्थ व बाराबलुतेदार समाज असल्याचा दावा करत कोणत्याही दबावाला बळी पडणार असल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.

hotel matoshree ranjangaon ganpati

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतची निवडणूक होण्यापूर्वी सदर अनुसूचित जाती जमातीतील जागा लढविण्यासाठी चार जन इच्छुक होते कोणीही माघार घेत असल्याने आम्ही प्रत्येकाला सव्वा वर्षे संधी देऊ असे ठरले होते. दरम्यान रमेश गडदे यांची सरपंच पदी वर्णी लागली मात्र सव्वा वर्षे झाल्याने सरपंच रमेश गडदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अनुसूचित जाती जमातीतील समाजाचे नेते प्रकाश आबुराव सोंडे यांनी केली आहे. तर याबाबत बोलताना गेली २० वर्षे गावच्या समाजकारणात वावरत असून समाजाचे प्रश्न व बाराबलुतेदार संघटनेसाठी कार्यरत राहून लोकांना सोबत घेऊन काम करत आहे. निवडणुकीमध्ये गावातील ग्रामस्थ व मतदारांनी माझ्या कर्तृत्वामुळे मला निवडून दिल्याने मी शिक्रापूर गावचा सरपंच झालो. त्यांनतर मी कोरोना काळात निधी नसतानाही दीड कोटीची विकासकामे केली तसेच सरपंच म्हणून कार्यरत असताना २१ लाख रुपयांची कामे मागासवर्गीय वस्ती व समाजासाठी केली आहे.

शिक्रापूरचा कचरा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने कचरा समस्येसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असून माझ्याकडे पुरावे आहेत. मात्र विरोधी गटाच्या विरोधामुळे व शिक्रापूर गावातील काही लोकांमुळे हा प्रश्न प्रलंबित राहत आहे. परंतु येत्या काही काळात कचरा प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असून माझ्या कर्तव्याशी कधीही कसूर करणार नाही. तसेच सध्या माझ्यावर सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात असून कोणत्याही दबावाला मी बळी पडणार नाही, असे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

3 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

21 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago