शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ॲलीकॉन कास्टलाय लिमिटेड कंपनीतील सुमारे 3 लाख 50 हजार रुपये किमतीचा ऐवज कंपनीच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करुन चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वसिम तवीर मनेर याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर( येथील ॲलीकॉन कास्टलाय लिमिटेड कंपनीत वापरले जाणारे बजाज वाहनांचे सिलेंडर हेड ठेवलेले असताना कंपनीचे जावक असोसिएट निलेश सरोदे हे कंपनीतील मालाचे मोजमाप करत असताना बजाज वाहनांचे तब्बल 350 सिलेंडर हेड कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती त्यांनी कंपनी व्यवस्थापकाला दिली असता त्यांनी कंपनीतील CCTV ची तपासणी केली असता कंपनीमध्ये माल वाहतुकीसाठी आलेल्या वसीम मनेर याने ताब्यातील एम एच १२ यु एम ८७३० या पिकअप वाहनातून सदर माल चोरून नेल्याची बाब समोर आली.
याबाबत राजेश अंबादास जैन (वय ५४) रा. सोमनाथ नगर वडगाव शेरी पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी वसिम तवीर मनेर रा. कोल्हापूर याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…